अशीच एक पहाट होती, काळीकुट्ट अमावास्येची रात्र जणू रातकिड्यांची किरकिर त्या भयाण शांततेचा भंग करीत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होती. त्या गार पहाटे मोगल सैनिक शांत झोपले होते आणि मराठे/ मावळे त्या काळोख रुपी मायेच्या पदरात काहीतरी हालचाल करू लागले. आणि एकदम त्या भयाण शांततेला चिरणारा आक्रोश आपल्या खोलीत गोड झोपेत असलेल्या शाहिस्तेखानाच्या कानात शिरला. खानाला काही सुचेनासे झालय, तो सैरावैरा पिसाळल्या सारखा करून खोलीच्या बाहेर निघून बघतो तर काय सर्वत्र कापाकापी सुरू झालेली व एक मनुष्यकृती आकृती हातात चकाकणारी तलवार घेऊन त्याच्याच दिशेने येताना दिसली. तो घाबरला, थरथरला, पिसाळला, सैरावैरा झाला. काहीच सुचत नव्हते त्याला, एकच मार्ग होता. भागो…….म्हणत तो पडत सुटला. चकाकणारी तलवार त्याचा पाठलाग करू लागली. खान समोर धावतो आहे तलवार त्याच्या मागे, खान समोर तलवार मागे खान समोर तलवार मागे, तोपर्यंत तलवार खानाच्या अगदी जवळ पोहचली तलवारधारी हात वरती गेला आणि क्षणात झाला वार. पण, तोपर्यंत खान खिडकीतून उडी टाकून पसार झाला होता. वार खिडकीच्या कट्यावर बसला, थोडक्यात वाचला खान. त्या चकाकणाऱ्या तलवारीतुन रक्ताचे थेंब सांडू लागले, खानचे तीन बोटे कापली गेली होते.
” जगाला इतिहास सांगणाऱ्या त्या क्षणाची साक्ष बनली ती शिवबांची तलवार “
अशा कितीतरी डोंगर येवढ्या सक्षांचे किल्ले बांधणाऱ्या शिवबांना मानाचा मुजरा .